मुलीच्या स्वागतासाठी शाळेची फी केली माफ

प्रभाकर धुरी - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

दोडामार्ग - स्त्री-भ्रूणहत्या रोखली जावी आणि मुलींचा जन्मदर वाढून मुला-मुलींच्या संख्येतील तफावत कमी व्हावी, या उद्देशाने येथील महात्मा गांधी मिशन स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने नवा उपक्रम हाती घेतला आहे. 

‘महात्मा गांधी’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाला मुलगी झाल्यास त्या पालकांचा जाहीर सत्कार करून शिक्षण घेत असलेल्या पाल्याला दत्तक घेऊन त्याची वर्षभरातील सर्व प्रकारची फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेत परवा (ता. १९) झालेल्या पालकांच्या सभेत संस्थाध्यक्ष विवेक नाईक यांनी याबाबत पालकांना माहिती दिली. पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले.

देशभरातील मुला-मुलींच्या जन्मदरात तफावत आहे. एका सर्व्हेनुसार एक हजार मुलांमागे ९७१ एवढे मुलींचे प्रमाण आहे. काही राज्यांत तर त्याहूनही कमी आहे. मुलांच्या जन्मासाठी स्त्री-भ्रूणहत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. 

देशासमोरील ती फार मोठी समस्या आहे. त्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना अमलात आणल्या जात आहेत. स्त्री-पुरुष समानता, शाळा-शाळांमधील मीना राजू मंच, बेटी बचाओ, बेटी पढाओ अशा उपक्रमांतून मुलींच्या जन्माबाबत पालकांमध्ये सकारात्मक विचार रुजविण्याचे प्रयत्न होत आहेत. 

महात्मा गांधी मिशन स्कूलनेही तसेच एक पाऊल उचलून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा संदेश दिला आहे. मुलगी ‘टेन्शन’ नाही, तर ती ‘टेन सन’ सारखी समर्थ आहे. त्यामुळे तिचे स्वागत करा, तिला नव्या जगात प्रवेश करू द्या, असाच प्रेरणादायी संदेशच जणू शाळेने दिला आहे.

मुला-मुलींच्या जन्मदरातील तफावत ही देशासमोरील गंभीर समस्या आहे. देशपातळीवरून त्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यात माझा खारीचा वाटा असावा, असे मला वाटते. असा उपक्रम शाळा, महाविद्यालयांनीही राबवावा. तसे झाले तर राज्यच नव्हे, देशभरात एक नवा बदल घडू शकतो.
- विवेक नाईक, अध्यक्ष, महात्मा गांधी मिशन स्कूल.

Web Title: Welcome to the waiver of school fees for the girls