गणेशोत्सवासाठी हजारो भाविक कोकणात रवाना

रविंद्र खरात
Thursday, 24 August 2017

कल्याण : गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने एसटी महामंडळाने केलेल्या विशेष बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बससाठी शासनाने टोलचा मोफत पास दिला आहे. 

कल्याण : गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने एसटी महामंडळाने केलेल्या विशेष बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बससाठी शासनाने टोलचा मोफत पास दिला आहे. 

पूर्व-पश्‍चिम कल्याण, मोहना, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवली, बदलापूर, दिवा येथून दरवर्षी चाकरमानी कुटुंबासह मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात. कल्याण, मुंबईतून पुणे-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल फ्री पास दिले जातील, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. यंदा कल्याण आरटीओमधून 90 हून अधिक, तर कल्याण-डोंबिवली वाहतूक शाखेतून शंभराहून अधिक नागरिकांना कोकणात जाण्यासाठी हा पास घेतला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली. 

कल्याण-डोंबिवली आणि विठ्ठलवाडी एसटी डेपोतून कोकणात जाण्या-येण्यासाठी दोनशेहून अधिक बस सोडण्यात येणार आहेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कल्याण एसटी डेपोमधील सहाय्यक वाहतूक अधिक्षक तुकाराम साळुंखे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Pune Ganesh Utsav Kokan Ganeshotsav