रत्नागिरीत सापडले आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्ण संख्या ४०२ वर तर मृतांची संख्या १६वर

10 more corona patient found in ratnagiri
10 more corona patient found in ratnagiri
Updated on

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण सापडत आहेत. काल सायंकाळपासून आलेल्या अहवालांपेकी  १० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्याची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ४०२ झाली आहे.  

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी ५ रत्नागिरीतील असून कामथे येथील १ दापोली येथील २ आणि संगमेश्वर येथील २ रुग्णांचा समावेश आहे. यातील दापोली येथील एक रुग्ण ११ जून रोजी दाखल करण्यासाठी आणला असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. त्याचा ही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात मृतांची संख्या १६ झालेली आहे. 


दरम्यान आज सात रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या २६७ झाली आहे. 


सकाळची बारा वाजेपर्यंत ची स्थिती :
एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या -  ४०२
बरे झालेल्या रुग्णांची संख्या  - २६७
मृत्यू   - १६
एकूण अँक्टिव्ह रुग्ण  -११८


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com