चिपळूण : चिपळूण शहर व खेड येथील महापुरास कारणीभूत ठरणारा, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख येथील वाशिष्ठी नदीवरील (Vashishti River) ब्रिटिशकालीन पूल (British Bridge) अखेर इतिहासजमा झाला आहे. गेले चार महिने सुरू असलेले या भागातील दोन्ही जुने पूल तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाशिष्ठी नदीचे पाणी वेगाने प्रवाहित होणार आहे. हा पूल पाडण्यासंदर्भात माजी नगरसेवक अरुण भोजने यांच्यासह काहींनी पाठपुरावा केला होता.