शिक्षक भरतीनंतरही 1063 शिक्षकांची पदे रिक्त

शिक्षक भरतीनंतरही 1063 शिक्षकांची पदे रिक्त

शिक्षक भरतीनंतरही १०६३ शिक्षकांची पदे रिक्त
जिल्हा परिषद ; रिक्त पदानुसार प्रक्रिया राबवण्यात दिरंगाई
रत्नागिरी, ता. ७ः जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकभरती झाली असली तरी अजूनही ही भरती अपुरीच ठरणार आहे. मे महिन्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेने ९९६ शिक्षकांची भरती केली. ही भरती होऊनही जिल्ह्यात अद्याप १ हजार ६३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न संपला असला तरी एकशिक्षकी शाळांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात शून्यशिक्षकी शाळा होऊ नये याकरिता रिक्त पदांनुसार शाळांना एक एक शिक्षक देताना शिक्षण विभागाला कसरत करावी लागत आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक पदे मोठ्या संख्येने रिक्त झाल्यामुळे अनेक शाळा शून्यशिक्षकी शाळा झाल्या होत्या. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता २०२३-२४ या वर्षाकरिता मानधनावर तात्पुरते शिक्षक नेमले होते. त्यानंतर जिल्ह्यात शिक्षकभरती झाली. आचारसंहितेमुळे शिक्षकभरती रखडली होती. मेमध्ये अखेर या शिक्षकभरतीला मुहूर्त मिळाला. समुपदेशनाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात ९९६ शिक्षकांची पदे भरण्यात आली. त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत ७१४ उपशिक्षक भरण्यात आले. सहावी ते आठवीपर्यंत २३० पदवीधर शिक्षक भरण्यात आले आणि उर्दूचे ५८ शिक्षक भरण्यात आले. जिल्ह्यात ९९६ शिक्षकांची भरती होऊनही १ हजार ६३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे भरती होऊनही शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा शिक्षकांचा गोंधळ ग्रामीण भागात होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेची कमान प्रशासनाकडे आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्यासाठी शासनाच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे अन्यथा पुन्हा पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकांची एकूण रिक्त पदांची संख्या लक्षात घेता त्यानुसार भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक होते.

कोट
मागील वेळी शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा शासनाने मानधनावर नेमलेल्या शिक्षकांना पुन्हा अशा कमी शिक्षकी शाळांवर नियुक्ती देणे आवश्यक आहे तरच शैक्षणिक गुणवत्ता व्यवस्थित राखणे शक्य होईल.
- परशुराम कदम, माजी समाजकल्याण सभापती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com