esakal | रत्नागिरीत पोलिस कोरोनाच्या विळख्यात, 107 जणांना लागण
sakal

बोलून बातमी शोधा

107 police suffer a corona positive including 7 police officers in ratnagiri

७ अधिकाऱ्यांचाही समावेश, पोलिस मुख्यालयात स्वतंत्र सेंटर

रत्नागिरीत पोलिस कोरोनाच्या विळख्यात, 107 जणांना लागण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोना योद्धा म्हणून जनतेच्या संरक्षणासाठी रस्त्यावर लढणारे पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. जिल्ह्यातील तब्बल १०७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यांमध्ये ७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक कर्मचारी रत्नागिरी तालुक्‍यातील आहेत; परंतु सर्वांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा होत आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

हेही वाचा - लाॅकडाउनचा असाही इफेक्ट! ऑनलाईन स्पर्धांचा कोकणात ट्रेंड ...

कोरोनाच्या सुरवातीच्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वच पोलिस रस्त्यावर थांबून कोरोनाशी युद्ध लढत होते आणि आजही लढत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनच्या काळात पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी २४ तास ते कार्यरत होते. यावेळी आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची पर्वा न करता पोलिसांनी आपली ड्यूटी चोख बजावली. परिणामी लॉकडाउन यशस्वी झाला; मात्र आता जिल्ह्याअंतर्गत सेवा सुरू झाल्या आणि पोलिसांचे काम वाढले. 

नागरिक खरेदी किंवा अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली बाहेर पडू लागले. या नागरिकांना रोखण्याच्या दृष्टीने कायद्याचा बडगा उगारण्यात आला. यावेळी अनेक नागरिक पोलिसांच्या संपर्कात आले. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. महाराष्ट्रात सगळीकडे पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत गेले. रत्नागिरी जिल्हादेखील यात मागे नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १०० कर्मचारी आणि ७ अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली आहे; मात्र यांतील बहुतांश कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित कर्मचारी, अधिकारी यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे.

हेही वाचा -  अभिनंदनीय बाब! बायोगॅस सयंत्र उभारणीत `या` जिल्ह्याचा डंका ..

बरे होण्याचे प्रमाण अधिक

जिल्हा पोलिस अधीक्षक मुंढे यांनी पोलिस मुख्यालयात पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना सेंटर सुरू केले आहे. याचा चांगला फायदा पोलिसांना झाला आहे. स्वतंत्र व्यवस्था असल्याने कर्मचारी बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोणत्याही कर्मचारी अथवा अधिकारी यांच्यात लक्षणे आढळल्यास त्वरित क्वारंटाईन केले जाते. त्यांना वैद्यकीय नियंत्रणाखाली ठेवले जाते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image