esakal | रत्नागिरी जिल्ह्यात 13 नवीन कोरोनाचे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

13 New Corona Affected In Ratnagiri District

आरोग्य विभागाकडून 105 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 95 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना चाचण्या करणाऱ्यांचा आकडा कमी झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 13 नवीन कोरोनाचे रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोनातील नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर जिल्ह्यात सगळीकडेच लगीनघाई, बाजारातील गर्दी, शाळा सुरू झाल्यामुळे लोकांचे एकत्र येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. परिणामी कोरोनाबाधितांचा आलखे चढता-उतरता असाच आहे. शनिवारी अचानक वाढलेला आकडा रविवारी (ता. 20) कमी झाला आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तेराजणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोरोनाच्या सावध हाका सर्वांनाच साद घालत असल्याचे चित्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे. 

आरोग्य विभागाकडून 105 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 95 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना चाचण्या करणाऱ्यांचा आकडा कमी झाला आहे. बाधित आलेल्या तेराजणांमध्ये रत्नागिरीत 3, दापोली 1, गुहागरमध्ये 6, संगमेश्‍वरला 1 तर राजापुरात 2 रुग्ण सापडले आहेत. परजिल्ह्यातील पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत असून लग्नसराईला जोर आला आहे. ठिकठिकाणी गर्दी वाढत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या निकषांना नागरिकांकडून फाटा दिला जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा कधी वाढतो तर कधी कमी होतो असे चित्र आहे. गेल्या पंधरा दिवसातील उच्चीकी नोंद शनिवारी (ता. 19) झाली.

त्यानंतर आज आकडा खाली आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या चाचण्यात 57 हजार 939 जणं निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात 9 रुग्ण बरे झाले असून एकूण संख्या 8 हजार 593 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ही दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 327 झाली असून जिल्ह्यात बरे होणाऱ्यांचा दर 94.88 टक्के आहे. 

loading image