निसर्गसंपन्न सिंधुदुर्गात (Sindhudurg) अलीकडे रहस्यमयी गोष्टी हळूहळू उजेडात येऊ लागल्या आहेत.
तळेरे : साळशी (ता. देवगड) येथील शेतकरी गणपत नाईक यांच्या समळेवाडी निवय भागात असणाऱ्या आंबा, काजू बागायतीमध्ये दिसलेल्या विवराचे गुढ वाढले आहे. वरून निमुळत्या आकाराचे हे भुयार जवळपास १५ फूट खोल विहिरीसारख्या (Well) मोठ्या व्यासाने दिसून येते. यामुळे ही भूगर्भातील उलथापालथ, भूस्खलन की पूर्वीच्या काळातील भुयार हा सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.