esakal | गव्यांचा धु़डगूस: बघता बघता १५० झाडांची केली नासधुस; पांगरी खुर्दतील प्रकार

बोलून बातमी शोधा

150 cashew trees destroyed konkan rain update

दोन दिवसांपूर्वी पांगरीखुर्द येथील रहिवाशी सुरेश तावडे यांच्या काजूच्या बागेत गव्याने घुसून दीडशे मोठ्या काजूच्या झाडांची नासधूस केली.

गव्यांचा धु़डगूस: बघता बघता १५० झाडांची केली नासधुस; पांगरी खुर्दतील प्रकार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) :  तालुक्‍यातील पाचल परिसरातील पांगरी खुर्द गावामध्ये गवा रेड्याने धुडघूस घातला आहे. दोन दिवसांपूर्वी येथील रहिवासी सुरेश सखाराम तावडे यांच्या दीडशे काजूच्या झाडांची गव्याने नासधूस केली आहे. त्यामध्ये सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून गव्यांच्या कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


पाचल परिसरातील गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून गव्या रेड्यांचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. या परिसरातील पावसाळी भातशेतीचे गव्यांच्या कळपाने नुकसानही केले आहे. गव्यांच्या या उपद्रवाचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. अशातच पांगरीखुर्द गावालाही गव्यांच्या उपद्रवाचा त्रास सहन करावा लागत आहे. 

दोन दिवसांपूर्वी पांगरीखुर्द येथील रहिवाशी सुरेश तावडे यांच्या काजूच्या बागेत गव्याने घुसून दीडशे मोठ्या काजूच्या झाडांची नासधूस केली. काही काजूची झाडे तर, मुळासकट उखडून टाकली आहेत.  दरम्यान, येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पांगरीखुर्द गावाला भेट दिली असून गव्याने घातलेल्या धुडघुशीमुळे काजुच्या झाडांच्या झालेल्या नुकसीनीची पाहणी केली. 

गव्यांचा कळप ? 
पांगरीखुर्द येथील शेतकऱ्यांच्या काजूच्या झाडांचे नुकसान गवा रेड्याने केले आहे. मात्र, दीडशे काजूच्या झाडांचे नुकसान पाहता कळप असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

संपादन-अर्चना बनगे