ही घटना समजल्यानंतर घोणसरे सुतारवाडीतील ग्रामस्थ आणि रस्त्यावरील प्रवाशांची अपघातग्रस्त चारचाकीमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली.
गुहागर : डोंबिवलीमधून पर्यटनासाठी गुहागरला (Guhagar) जाणाऱ्या टेम्पोला घोणसरे सुतारवाडी येथे अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जावून आदळले. या अपघातात चालकासह १७ जण जखमी झाले आहेत.