esakal | रत्नागिरी जिल्ह्यात दिवसात उच्चांकी 173 बाधित, दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

०

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून बाधितांची संख्या चिंता वाढविणारी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसात उच्चांकी 173 बाधित, दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरूवारी एका दिवसात उच्चांकी म्हणजे 173 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 4 हजार 372 झाली आहे. दिवसभरात 49 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 2 हजार 883 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कालच्या तुलनेत घसरले आहे. काल 66.06 टक्के बरे होण्याचे प्रमाण होते. ते आज 65.94 झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाने आज आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 141 झाली आहे. 

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून बाधितांची संख्या चिंता वाढविणारी आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या आरोग्य विभागाचा ताण वाढविणारी ठरत आहे. काल जिल्ह्यात 142 कोरोना बाधित मिळाले होते. गुरूवारी आकडा वाढला असून, 173 रुग्ण सापडले आहेत. आरटीपीसीआरमध्ये 60, तर अँटिजेन टेस्टमध्ये 113 बाधित आहेत. याध्ये सर्वाधिक बाधितांची संख्या खेड, रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्‍यात आहे. चिपळूण- 40, लांजा- 17, गुहागर- 5, दापोली- 2, संगमेश्‍वर- 7, राजापूर- 0, खेड- 54, मंडणगड- 0, रत्नागिरी- 48, असे 173 बाधित सापडले आहेत. जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला असून, एक रत्नागिरी आणि मंडणगड येथील आहे. एकूण मृतांची संख्या 141 वर गेली आहे. 

जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्याच्यादृष्टीने आरोग्य विभाग आणि प्रशासनाचे प्रयत्न आहे, मात्र तो वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात काल 3.31 मृत्यू दर होता. तो 0.09 टक्‍क्‍याने कमी झाला आहे. 

49 कोरोनामुक्त

दिवसभरात जिल्ह्यातील 49 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. महिला रुग्णालय 19, गुहागर 11, बीएड कॉलेज 9 येथील बरे झालेले रुग्ण आहेत. 2 हजार 883 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होण्याची टक्केवारी काल 66.06 टक्के होती, ती आज 65.94 झाली आहे. रत्नागिरी तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण सापडले असून, त्यामध्ये नेवरे येथील एकाच गावातील 10 जणांचा समावेश आहे. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या केलेल्या अँटिजेन टेस्टमध्ये 9 जण बाधित सापडले आहेत. आज चाचणीमध्ये निगेटिव्ह आलेल्यांची संख्या 280 आहेत. 

       जिल्ह्याची स्थिती 

  • एकूण बाधित रुग्ण --4372 
  • एकूण निगेटिव्ह --24826 
  • आजचे निगेटिव्ह --280 
  • एकूण मृत --141 
  • बरे झालेले -- 2883 
  • दाखल रुग्ण --736  

संपादन : विजय वेदपाठक 
 

loading image