राजापूर : घाटमाथा आणि कोकणाला जोडणारा सह्याद्रीच्या घाट मार्गातील अणुस्कुरा घाटातून प्रवास करणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी अणुस्कुरा घाटात (Anuskura Ghat) सज्ज असणाऱ्या संरक्षक फौजेची माहिती देणाऱ्या १७ व्या शतकातील देवनागरी लिपीतील (Devanagari) शिलालेख नुकताच अभ्यासकांच्या हाती लागला आहे. यामुळे या परिसरातील इतिहासाच्या अभ्यासाचे काही आयाम ध्यानी येऊ शकतील.