Ratnagiri Crime : नर्सिंगला असलेल्या तरुणीवर रत्नागिरीत अत्याचार; रिक्षातून चंपक मैदानावर नेलं अन् तिच्यावर..

Ratnagiri Police : या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला. नराधमाला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिस अधिकाऱ्यांना जमावाने घेराओ घातला.
Ratnagiri Crime
Ratnagiri Crimeesakal
Updated on
Summary

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यानंतर मोठ्या संख्येने विविध संघटना आणि पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सर्वसामान्य महिला जिल्हा रुग्णालयात जमा झाले.

रत्नागिरी : बदलापूर आणि कोल्हापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर रत्नागिरीतही (Torture of Young Girl) तसाच प्रकार घडला आहे. नर्सिंगला असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला रिक्षात घेऊन शहराजवळील चंपक मैदानावर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार काल सकाळी उघड झाला. तरुणीने दिलेल्या जबाबानुसार, पोलिस (Ratnagiri Police) त्या रिक्षाचालकाच्या शोधात आहेत. या पीडित तरुणीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बातमी पसरताच शहरात प्रक्षोभ उसळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com