या योजनेंतर्गत ४७७ शेतकऱ्यांसाठी सात कोटी ७५ लाख ६ हजार ३३३ रुपये मिळावेत, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला होता.
रत्नागिरी : फेब्रुवारी व मार्च २०१४ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) रूपांतरित कर्जावर (पुनर्गठित) २०१४-१६ या वर्षाचे संपूर्ण व्याज आणि पुढील चार वर्षांची व्याजमाफी सहा टक्के दराने देण्याचा निर्णय शासनाने २०२४ मधील विधानसभा निवडणुकांपूर्वी (Assembly Elections) घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २९७ शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख २३ हजार ५९५ रुपये मिळाले आहेत.