Janmashtami : हर्णै गावात गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एका गोविंदाच्या अचानक आलेल्या मृत्यूने दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावातील दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं.
वसंत लाया चौगले
वसंत लाया चौगलेSakal

हर्णै : दापोलीतील पाजपंढरी गावात एका गोविंदाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. कोरोना नंतर दोन वर्षांनी दहीहंडीचा उत्सव रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मात्र एका गोविंदाच्या अचानक आलेल्या मृत्यूने दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावातील दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं. मिरवणुकीत सहभागी झालेल्या गोविंदाचा हृदयविकाराने दुर्देवी मृत्यू झाला. काल दुपारी पाजपंढरी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वसंत लाया चौगले असं या मृत गोविंदाचं नाव आहे.

गावात सकाळ पासूनच दहीहंडीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहत सुरुवात झाली होती. वसंत चौगुलेही दहीहंडीत सहभागी झाले होते. मात्र नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आली. त्यांना तातडीने नातेवाईकांनी व उपस्थित नागरिकांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ४८ वर्षांचे होते. त्यामुळे गावातल्या दहीहंडी उत्सवावर शोककळा पसरली होती. त्यांच्यावर आज सकाळी (ता.२०) पाजपंढरी येथील स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com