सुधागड तालुक्यात देवीचे विसर्जनावेळी 2 तरुणांचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

immersion

सुधागड तालुक्यात देवीचे विसर्जनावेळी 2 तरुणांचा बुडून मृत्यू

sakal_logo
By
अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : घरगुती देवीचे विसर्जनावेळी शुक्रवारी (ता.15) सायंकाळी 6 च्या दरम्यान सुधागड तालुक्यातील राबगाव येथील 2 तरुणांचा तमोसोली पुलाजवळ अंबा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. शिवेंद्र चौहान (वय 23) विवेक लहाने (वय 22) दोघेही राहणार राबगाव. असे मृत तरुणांचे नाव आहे.

देवीचे विसर्जन करून परततांना दडगडावरून पाय घसरून नदीत पडून हे तरुण बुडाले आहेत. या संदर्भात पाली पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित साबळे हे करीत आहेत.

loading image
go to top