रत्नागिरीतील 23 हजार दिव्यांग देणार लढा

मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

रत्नागिरी : दापोलीपासून 18 किलोमीटरवरील पाजपंढरी गावात 175 दिव्यांग व्यक्ती आहेत. यातील 50 टक्के व्यक्ती पोलिओचे रुग्ण आहेत. या सर्व व्यक्तींचे वय 40 ते 45 एवढे आहे. पोलिओचे भारतातून निर्मूलन झाले तरीही आज हे सारे जण हालाखीचे जीवन जगत आहेत.

शासनाची पेन्शन फक्त 600 रुपये मिळते; पण तीही वेळेवर नाही. कर्जासाठी बॅंकांमध्ये खेटे मारावे लागतात, त्यामुळे हे लोक बॅंकेत जात नाहीत. दापोली तालुक्‍यात सर्वाधिक 4500 व जिल्ह्यात 23 हजार दिव्यांग आहेत. या सर्व व्यक्तींना एकत्र करून लढा उभारण्याचे काम रत्नागिरी हॅंडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन करणार आहे.

जागतिक अपंग दिनानिमित्त आज साई मंगल कार्यालयात जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती एकत्र आल्या आणि सर्वांनी संघटित होऊन लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. दिव्यांगांचे दुःख सांगताना पाजपंढरीतील अनिल रघुवीर म्हणाले, ""40-50 वर्षांपूर्वी फारशा सुविधा नव्हत्या. आई-वडील कायमच मच्छीमारी करत असल्याने अनेकांना पोलिओ झाला. योग्य वेळेत उपाय करता आले नाहीत. दापोलीत सरकारी दवाखाना आहे. अशिक्षितपणामुळे रुग्णांची संख्या वाढत गेली.''

ते म्हणाले, "2009 मध्ये मी विकलांग पुनर्वसन स्वयंरोजगार सर्व सेवा उद्योग सहकारी संस्था स्थापन केली. अस्थिव्यंग 50 टक्के, अंध, कर्णबधिर, मूकबधिर आदी प्रकारचे 175 व्यक्ती सभासद आहेत. हातावर पोट असणारे हे सर्व दिव्यांग पानपट्टी, मच्छीचे जाळे विणणे, घरबसल्या काही छोटे व्यवसाय करतात.''

शासनाच्या योजनांचा लाभ घेताना उत्पन्नाची अट अडचणीची ठरते. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे जादा उत्पन्न दिसते व योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी शासनाने उत्पन्नाची अट शिथिल करावी, अशी मागणी रघुवीर यांनी केली. या वेळी कसबा-लेंडी येथील अरविंद चव्हाण यांना व्हीलचेअर देण्यात आली. संजय लटके या अंध कलाकाराने सुरेख गीते सुरेल आवाजात ऐकवून सर्वांची मने जिंकली.

Web Title: 23000 specially abled to fight