सावंतवाडी काँग्रेस कार्यकारिणीत यांचा समावेश 

28 Members In Executive Committee Of Sawantwadi Congress
28 Members In Executive Committee Of Sawantwadi Congress

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - तालुका कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महेंद्र सांगेलकर यांनी पहिल्या टप्प्यातील 28 जणांची तालुका कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये तालुका उपाध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार, सहखजिनदार, तालुका चिटणीस व सदस्य निवडण्यात आले असून त्याला जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी मंजुरी दिली. 

दरम्यान या निवडीसंदर्भात तालुकाध्यक्ष श्री. सांगेलकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे की, जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांमध्ये गाव या दौरा करून ज्येष्ठ व तरूण कार्यकर्त्यांची चर्चा विनिमय करून त्यातील तालुक्‍यात काम करू इच्छीणाऱ्या कार्यकर्त्यांची कार्यक्षमता पाहून त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली होती. त्यानुसार मी तालुक्‍यामध्ये ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांची चर्चा करून तेथील कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेल्या त्या भागातील कार्यकर्त्यांना तालुका कार्यकारणीमध्ये समाविष्ट करून घेतले आहे. जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्ष व जिल्हा कॉंग्रेसच्या सूचनेनुसार मी कार्यकारणी निवडली असल्याचे स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील ही कार्यकारणी असून दुसऱ्या टप्प्यातील कार्यकारणी चार दिवसात जाहीर करू असेही श्री. सांगेलकर यांनी म्हटले आहे. 

तालुका कार्यकारिणी अशी  

तालुका उपाध्यक्ष - बाबुराव राऊळ, सुधाकर सुकी, प्रकाश दळवी, तुकाराम केदार, समीर वंजारी, तालुका सरचिटणीस संजय राऊळ, अभय किनळोस्कर, दिगंबर परब, नारायण जाधव, कृष्णा आमडोस्कर. तालुका खजिनदार आणि सहखजिनदार पदी प्रमोद परब, सुहास सावंत. तालुका चिटणीस - सिद्धेश भिसे, प्रदीप सावंत, राकेश विर्नोडकर, संजय लाड, राजू बिड्ये, मनस्वी राऊळ, प्रकाश राऊत. कार्यकारणी सदस्य - मनोहर राऊळ, गोपाळ राऊळ, मोहसीन मुल्ला, लक्ष्मण सावंत, विजय सावंत, कृष्णा परब, पर्सीअस डायस, स्नेहा आरोंदेकर, हुसेन खान. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com