१० ग्रॅम हळकुंडाच्या रोपापासून ३ किलो ८०० ग्रॅमचा गड्डा

शेतकरी सुरेश लोखंडे यांच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने उत्पादन ; नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनकडून कौतुक
3 kg 800 gm bunch from 10 gm turmeric seedling
3 kg 800 gm bunch from 10 gm turmeric seedlingsakal

मंडणगड : शेणखत व जीवामृताचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या हळदीच्या १० ग्रॅम वजन असणाऱ्या हळकुंडाच्या एका रोपापासून ३ किलो ८०० ग्रॅम हळदीचा गड्डा मिळाला. पंचायत समिती, मंडणगडमार्फत राबवण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण प्रकल्पातील कुंबळे येथील शेतकरी सुरेश लोखंडे यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये ही किमया घडली. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाशी संलग्न स्वायत्त संस्था असलेल्या नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन इंडिया गुजरातचे वरिष्ठ प्रकल्प सहकारी विपीन रातुरी यांनी या लागवडीला भेट दिली.

3 kg 800 gm bunch from 10 gm turmeric seedling
वन नेशन-वन रजिस्ट्रेशन; जमिनीचे वाद आणि बनावट खरेदीपत्रं रोखण्यास होणार मदत

या उपक्रमात सचिन कारेकर यांच्या एसके-४ (स्पेशल कोकण - ४) या हळदीच्या वाणाचा उपयोग लागवडीसाठी केला होता. विशेषतः ही लागवड हळद रोपांपासून केली होती. पिकाच्या नवीन जातीच्या निर्मितीसाठी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, इंडिया गुजरात ही संस्था काम करते. याच संस्थेने एसके-४ या हळदीच्या वाणाच्या परीक्षणासाठी प्रयत्न केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीकडून मागच्या वर्षी या वाणाचे परीक्षण करून घेतले होते. दापोली विद्यापीठाकडून या हळदीच्या एसके-४ (स्पेशल कोकण -४) वाणाबाबत इतर हळदीच्या वाणापेक्षा सकारात्मक अहवालही मागच्या वर्षी प्राप्त झाला तसेच विद्यापीठाकडून एसके-४ या हळदीच्या जातीची मोठ्या प्रमाणात रोपे तयार केली व लागवडही केली आहे.

3 kg 800 gm bunch from 10 gm turmeric seedling
राज्यात कोरोना मृतांचा आलेख वाढला; दिवसभरात १८०६७ नव्या रुग्णांची भर

विशेषतः हा संपूर्ण प्लॉट सेंद्रिय व्यवस्थापनाखाली तयार केला होता. सुरेश लोखंडे यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत वेळोवेळी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले. लागवडीच्या अंतर राखण्यापासून भर घालणे व इतर व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्याने लोखंडे यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ काढलेल्या गड्ड्यावरून दिसून आले. या वेळी एसके-४ हळदीचे प्रणेते आबलोली येथील सचिन कारेकर, पंचायत समिती मंडणगडचे कृषी अधिकारी विशाल जाधव, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, पवन गोसावी, शेतकरी सुरेश लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य समीक्षा लोखंडे, संदेश लोखंडे, ज्योती शिंदे, आत्माराम कदम उपस्थित होते.

४० हजार रोपे, सुमारे ५ एकरावर लागवड

मंडणगड तालुक्यात SK-४ या हळदीच्या वाणाचे जवळपास ४० हजार रोपे तयार करून सुमारे ५ एकर क्षेत्रावर लागवड केली होती. ५० शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. विपीन रातुरी यांनी खासकरून मंडणगड येथील हळद लागवड प्रकल्पाला भेट देण्यासाठी, शेतकऱ्यांचे अनुभव व प्रत्यक्ष परीक्षण, मोजमापे घेण्यासाठी आले होते. सुरेश लोखंडे यांच्या प्लॉटला भेट देऊन हळदीच्या गड्ड्याचे मोजमाप करून सर्व माहिती घेतली. प्लॉटवरचा हळदीचा गड्डा रातुरी यांच्या समक्षच काढण्यात आला. रोपांची उंची, गड्ड्याचे वजन, हळकुंडाची लांबी, वजन याबाबतचे मोजमापही घेण्यात आले. या वेळी सर्वांसमक्ष हळदीचा गड्डा काढून त्याचे वजन केले असता सुमारे ३ किलो ८०० ग्रॅम एवढे झाले.

3 kg 800 gm bunch from 10 gm turmeric seedling
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

हळदीच्या एका रोपापासून एवढा मोठा गड्डा निर्माण होऊ शकतो, यावर आमचा विश्वास बसत नव्हता; पण सर्वांच्या समक्ष ''याची डोळा..'' हे बघून खूप आनंद झाला. एवढं उत्पन्न आपण काढू, हा विश्वास आता निर्माण झाला आहे.

- सुरेश लोखंडे, शेतकरी

दृष्टिक्षेपात...

  • पंचायत समिती, मंडणगडचा प्रकल्प

  • कुंबळेतील शेतकरी सुरेश लोखंडेंचे यश

  • शेणखत, जीवामृताचा वापर परिणामकारक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com