मंत्री उदय सामंत म्हणाले,  कोकणसाठी इतका निधी मंजूर 

360 Cores Fund Approved For Konkan Uday Samant Comment
360 Cores Fund Approved For Konkan Uday Samant Comment

रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी 360 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये रत्नागिरीला 150 कोटी रुपये मिळणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात 93 टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत, शिवाय मदतीचे वाटप देखील सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, निसर्ग चक्रीवादळात रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचे नुकसान झालेली आहे. यामुळे कोकण आयुक्त यांनी शासनाकडे 360 कोटी रुपये निधीची मागणी केली होती. ती मागणी काल मुख्यमंत्री यांच्यासमवेत आपल्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्याता दिली. आज हा निधी वर्ग होईल. जी कुटुंबे बाधित आहेत. त्यांच्या बॅंक खात्यात हा निधी पडणार आहे. जिल्ह्यामध्ये 794 गावे बाधित झालेली आहेत. मात्र जीवित हानी झालेली नाही. जिल्ह्यामध्ये 1770 घरे पूर्णपणे जमिनदोस्त झाली असून 41 हजार 306 अंशतः बाधित झाली आहेत. जिल्ह्यांमध्ये 1871 गोठे, 756 दुकाने बाधित झाली असून 94 जनावरे दगावली आहेत.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com