ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडले आणखी ४० नवे कोरोना पॉझिटीव्ह....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

जिल्ह्यात आज सकाळी प्राप्त अहवालानुसार  ४० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

रत्नागिरी : जिल्ह्यात आज सकाळी प्राप्त अहवालानुसार  ४० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात कामथे येथील १४, रत्नागिरीतील ८, राजापूर २, कळंबणी ७ आणि दापोली तालुक्यातील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

जिल्हा रुग्णालयातील आणखी तिघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय काल पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तिघाजणांना कोरोनाची लागण झाली आहे. चिपळूणमध्ये आज १४ रूग्ण वाढले आहेत. १३ शहरातील पेठमाप- गोवळकोट रोड अलहिजा या एकाच इमारतीतील असून १ केतकीतील आहे. 

हेही वाचा- आमनसामने या, मग बघूया : उदय सामंत ; पालकमंत्री आणि मी एकत्र काम करतोय... -

शासकीय रुग्णालयातील अधिसेविका ही कोविड बाधित निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कळंबणीतील अहवालामध्ये घरडातील ५ पाच नवे पॉझिटीव्ह असल्याची माहिती आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 corona patient found in ratnagiri district