'खात्री बाळगा, शिंदे गटाचे 40 गद्दार आमदार लवकरच अपात्र होतील'; ठाकरे गटाच्या माजी खासदाराला विश्वास

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा गट नसून मूळ शिवसेना (Shiv Sena) पक्ष आहे.
Uddhav Thackeray group Shiv Sena Senior leader Anant Geete
Uddhav Thackeray group Shiv Sena Senior leader Anant Geeteesakal
Summary

७० वर्षे सत्ता भोगून काँगेसने एवढे गलिच्छ राजकारण केले नाही. आज बिहार, युपीपेक्षा खालच्या दर्जाचे राजकारण आपल्या राज्यात होत आहे.

गावतळे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा गट नसून मूळ शिवसेना (Shiv Sena) पक्ष आहे. निवडणूक आयोगाविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. निकाल आपल्या बाजूनेच लागेल ही खात्री बाळगा. ४० गद्दार आमदार अपात्र होतील. राजकारणातला व्हिलन भाजप आहे, असा आरोप ठाकरे गट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते (Anant Geete) यांनी केला.

७० वर्षे सत्ता भोगून काँगेसने एवढे गलिच्छ राजकारण केले नाही. आज बिहार, युपीपेक्षा खालच्या दर्जाचे राजकारण आपल्या राज्यात होत आहे. हे थांबवण्यासाठी भाजपला संपवले पाहिजे. भाजपने घरं फोडली आहेत, असा घणाघातही माजी खासदार अनंत गीते यांनी केला.

Uddhav Thackeray group Shiv Sena Senior leader Anant Geete
Rajan Salvi : 'मला अटक झाली तरी चालेल, पण पुन्हा ACB च्या चौकशीला जाणार नाही'; आमदार राजन साळवी संतापले

दापोली तालुक्यातील शिवनारी या संपूर्ण गावाने १३ जानेवारीला दुपारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखेचे उद्‌घाटन झाले. त्या वेळी अनंत गीते बोलत होते. माजी आमदार संजय कदम म्हणाले, ‘आमदारकी नसताना गावदेवीकडे जाणारा २० लाखांचा पूल बांधला. संपूर्ण शिवनारी गाव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील झाल्याने विरोधक चिंतेत असतील. आता सर्वांनी गीते यांना विजयी करण्याचा विडा उचलला आहे.

Uddhav Thackeray group Shiv Sena Senior leader Anant Geete
Talathi Bharti : 'तो' आरोप सिद्ध न केल्यास रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार; मंत्री विखे-पाटलांचा स्पष्ट इशारा

अवकाळी पाऊस पडला. सरकारने आंबा, काजू बागायतदारांसाठी काहीच केले नाही. वन्यप्राणी खूप त्रास देतात म्हणून येथील शेतकऱ्यांनी शेती सोडली. त्यांच्यासाठी रामदास कदम, योगेश कदम यांनी काय केलं? गीते ऊर्जामंत्री झाल्यावर कोकणातील भारनियमन बंद केलं होतं. या प्रसंगी जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, संजय रामाणे, उपजिल्हाप्रमुख विजय जाधव, तालुका सचिव नरेंद्र करमरकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com