मंडणगड - दाभोळ वरून मुंबईकडे जाणारी दापोली आगाराची एसटी बस बसचे चालकाचा ताबा सुटल्याने शेनाळे घाटातील चिंचाळी धरणाजवळ असलेल्या एका वळणानजीक असलेल्या दरीत पलटी झाली. बस पलटी होवून सुमारे पंधरा फुट खाली दरीत गेल्यानंतर एका झाडाच्या व दगडाच्या आधारावर ही बस अडकल्याने खोल दरीत धरणाच्या पाण्यात पडून होणारा मोठा अनर्थ सुदैवाने टळला.