घर-दार सोडून 'ते' लढताहेत कोरोनाशी! 

50 workers work in ratnagiri district hospital
50 workers work in ratnagiri district hospital
Updated on

रत्नागिरी - कोरोनाविरुद्ध युद्ध लढताना ते महिनाभर घरच्यांपासून दुरावले आहेत. मग आई-वडील, पती-पत्नी आणि मुलांना प्रत्यक्ष पाहणे सोडाच. जिल्हा प्रशासन, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस दलाबरोबर जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डात प्रत्यक्ष काम करणार्‍या 35 कर्मचार्‍यांचे योगदान अमूल्य आहे. कुटुंबाची, मुलांची लागलेली आस, तरीही आधी राष्ट्रसेवा मग कुटुंब, या भावनेने काम करणारे कर्मचारी खरे वॉरीअर्स आहेत.


जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करणे हा एकमेव ध्यास सर्वांनी घेतला आहे. आरोग्य सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांची, जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत काम करणार्‍या परिचारिका, वॉर्डबॉय, शिपाई, वॉचमन, पोलिस कर्मचारी, आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. जिल्हा रुग्णालय म्हणजे आताच्या कोरोना रुग्णालयात 11, तर संशयित वार्डात परिचारिकांसह 9 कर्मचारी कार्यरत आहेत. स्क्रिनिंग विभागात 7, अतिदक्षता विभागात 8 आदींचा यामध्ये समावेश आहे. यापैकी काहींची लहान-लहान मुले आहेत. मात्र  कर्तव्यनिष्ठेमुळे एका महिन्यापेक्षा जास्त काळ आपली, मुले, कुटुंब, पती-पत्नी, आई-वडील यांच्यापासून दुरावले आहेत. कोरोनाशी लढणार्‍या या वॉरिअर्सना जिल्हा रुग्णालयातून सोडले जाते. मात्र खबरदरी म्हणून ते आपल्या कुटुंबांमध्ये सामिल होत नाहीत. त्यांच्यापासून अलिप्त राहून दिवस काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

केवळ कोरोना रुग्णांना बरे करता यावे, म्हणून महिनाभराहून अधिक काळ येथील प्रत्येक कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर मानसिक दडपण आहे. मात्र कोरोनाला हरविण्यासाठी या दडपणावर मात करून प्रत्येक कर्मचारी कार्यरत असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. स्वतःचा जीव धोक्यात घालून केवळ रुग्णसेवा करणार्‍या परिचारिकांकडून रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या नागरिकांनी खूप काही शिकण्यासारखे आहे. या 35 कर्मचार्‍यांनी कोरोना संपवण्याचा विडाच उचलला आहे.

नात्यात मोबाईलच दुवा

कोरोना रुग्णालयात काम करणार्‍या रुग्णांपैकी अनेकांची लहान मुलं आहेत. त्यापैकी एका कर्मचार्‍याला 8 वर्षाची चिमुकली आहे. कोरोनामुळे दुरावल्याने हे दोघे सध्या मोबाईलवरूनच एकमेकांच्या संपर्कात आहेत. आई, वडील आणि चिमुकलीच्या नात्यात मोबाईल दुवा ठरत आहे.


रुग्णालयात दिवसभर 8 ते 12 तास ड्युटी
जीव धोक्यात घालून सेवा देतो. त्यामुळे त्रास होतो; मात्र उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाचे आशीर्वाद मिळतात. तेच आम्हाला कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ देतात.

-गायत्री गोराटे, कोरोना रुग्णालयातील कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com