शेतकऱ्यांसाठी खुशखबर : लगेच आपले बॅक खाते चेक करा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

51 lakh compensation to farmers in Mandangad kokan marathi news

मंडणगडातील शेतकऱ्यांना  51 लाख नुकसान भरपाई ..क्‍यार वादळ ; अवकाळीचा फटका ; 2587 शेतकऱ्यांचा समावेश 

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : लगेच आपले बॅक खाते चेक करा...

मंडणगड (रत्नागिरी) : क्‍यार वादळ व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या मंडणगड तालुक्‍यातील 2587 शेतकऱ्यांना राज्यशासनाकडून 51 लाख 60 हजार 60 रुपयांच्या नुकसान भरपाई निधी वाटप करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. 

हेही वाचा- ब्रेकिंग - मुख्यमंत्र्यांसमोरच संतापले भास्कर जाधव ; खासदारांचा झटकला हात
ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत क्‍यार वादळ व अवकाळी पावसामुळे तालुक्‍यातील शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील बाधित भातशेतीची प्रशासनाच्या वतीने तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांनी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे केले होते. क्‍यार वादळामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.

हेही वाचा- फिल्मी स्टाईलने चाकूचा धाक दाखवून ४० लाखांचा ऐवज लुटला...

2587 शेतकऱ्यांचे नुकसान​

परतीचा पाऊस अनेक दिवस नियमित पावसाप्रमाणे बरसल्याने तयार झालेली शेती या अवकाळी पावसात वाया गेली. तालुक्‍यातील 2587 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा पंचनामे करण्यात आले होते. त्यासाठी शासन निर्णयानुसार 53 लाख 91 हजार 100 रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातील 51 लाख 60 हजार 60 रुपये शेतकऱ्यांच्या बचत खात्यात थेट जमा करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आली. उर्वरित वाढीव निधी शासनाकडे परत जाणार आहे.