रत्नागिरीत 6 लाख 29 हजार ब्रास वाळूचे होणार उत्खनन ; हातपाटीला परवानगी 

राजेश शेळके
Tuesday, 27 October 2020

जिल्ह्यातील आंजर्ला खाडीतील 3 गट, दाभोळ, जयगड आणि काळबादेवी या तीन खाड्यामधील प्रत्येकी एक गट अशी एकूण 6 हातपाटी गट आहेत.

रत्नागिरी - जिल्ह्यात हातपाटी वाळू उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने जिल्ह्यातील चार खाट्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये 6 लाख 29 हजार 357 ब्रास वाळू काढण्यास योग्य असून तशी परवानगी दिली आहे. मात्र वाळूच्या उत्खननासाठी परवाने देणे आणि दर निश्‍चित करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाने शासनाकडे पाठविला आहे.
 

परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने यंदाच्या हातपाटी वाळू लिलाव प्रक्रियेला काहीसा उशिर झाला आहे. 
कोकणासाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस असतो. त्यामुळे खनिकर्म विभागाचे ऑक्टोबर ते सप्टेंबर असे आर्थिक वर्ष ग्राह्य धरण्यात येते. पूर्वी वाळू उत्खननासाठी खनिकर्म विभागाकडून परवानगी दिली जात होती. मात्र आता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला हे अधिकार दिले आहेत. त्यानुसार मेरिटाईम बोर्डाने खाड्यांचे सर्व्हेक्षण करून वाळू उत्खननाची जागा निश्‍चित करून परवानागी दिली जाते. तशी परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील आंजर्ला खाडीतील 3 गट, दाभोळ, जयगड आणि काळबादेवी या तीन खाड्यामधील प्रत्येकी एक गट अशी एकूण 6 हातपाटी गट आहेत. यात  6 लाख 29 हजार 357 ब्रास वाळू उपसाला मेरीटाईम बोर्डाकडून परवानगी देण्यात आली आहे. यासाठी वाळुच्या उत्खननसाठी आता दर निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडे लवकच प्रस्ताव पाठण्यात येणार आहे. ड्रेजरने वाळू उपसा करण्यासाठीही मेरीटाईम बोर्डाकडून सर्व्हेक्षण झाल्यानंतर वाळू उत्खननसाठी ना हरकत परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी दिग्विजय पाटील यांनी याला दुजारो दिला.

हे पण वाचासरकार मराठा आरक्षण प्रश्‍नापासून पळ काढते

 

खाडी                             वाळू (ब्रास)

आंजर्ले खाडी (3 गट)          2,50,398
दाभोल (1 गट )                1, 92,877
जयगड (1 गट)                    40, 058
काळबादेवी (1 गट)             1,46,024
 
एकुण (6 गट)                   6,29,357

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 lakh 29 thousand brass sands will be excavated in Ratnagiri