लांजा तालुक्‍यातील 60 जणांचा भाजप प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्रात 300 पेक्षा जास्त खासदार घेऊन राष्ट्रीय हिताला महत्त्व देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तास्थानी आहे. अशा ताकदवान पक्षात आपण प्रवेश केला आहे.

रत्नागिरी -  लांजा तालुक्‍यातील विविध गावातील मोठ्या संख्येने युवक, महिला आणि नागरिकांनी भाजपात प्रवेश केला. लांजा तालुक्‍याला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्यासाठी शेतकरी वर्ग, युवक या सर्वांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी भाजप उत्तम कार्य करेल, हा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवत साठ जणांनी भाजप प्रवेश केल्याचा दावा जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी केला. 

रत्नागिरीतील जिल्हा कार्यालयात या कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. जिल्हाध्यक्ष ऍड. पटवर्धन यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी भाजप सरचिटणीस यशवंत वाकडे, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन, लांजा तालुका प्रभारी वसंत घडशी, तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, प्रसाद पाटोळे, सचिन करमरकर, महेंद्र मांडवकर उपस्थित होते. 

या प्रसंगी ऍड. पटवर्धन म्हणाले की, भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्रात 300 पेक्षा जास्त खासदार घेऊन राष्ट्रीय हिताला महत्त्व देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तास्थानी आहे. अशा ताकदवान पक्षात आपण प्रवेश केला आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याची ताकद आपल्या सर्वांमुळे भाजपला प्राप्त होत आहे.

आत्मनिर्भर योजनेचा उचित लाभ घेत युवकांनी नवे उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे यावे. त्यांना विविध योजनांचा आधार दिला जाईल. मोदींजींच्या गावातील विश्वासू प्रतिनिधी म्हणून भाजपामध्ये सर्वांनी सक्रिय व्हा. विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया.

या प्रसंगी लांजा येथील देवेंद्र झिमण, संतोष आग्रे, चंद्रकांत मोघे, मधुकर पालये, संतोष काजरेकर, नारायण बोल्ये, नारायण पालये, मंगेश आग्रे, प्रभाकर पुनाजी, बळीराम आगरे, एकनाथ आग्रे, संतोष आग्रे, अनिकेत वीर, प्रथमेश दाभोळकर, विशाल दाभोळकर, संदीप दाभोळकर, अभिषेक दाभोळकर, संतोष दाभोळकर, पायल निबदे, मयुरी चव्हाण, प्रज्ञा पवार, संकेत कडू, महेंद्र नारकर, तेजस्वी पवार, प्रीती पवार, प्रकाश बापर्डेकर, प्रशांत वारीसे, सुवर्णा बोल्ये, तृप्ती वाकडे, वैष्णवी ठीक, योगिता वाकडे, प्रतीक्षा घडशी, मानसी घडशी, किमया घडशी, सोनाली कुंभार, विशाखा घडशी, वैभवी सुर्वे, भारती काजरेकर या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 Peoples From Lanja Taluka Enters In BJP