कोरोनाचा सहावा बळी : मृत्यू नंतर तीचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह अन्...

निलेश मोरजकर
Wednesday, 22 July 2020

जिल्ह्यात कोरोनाचा एकूण सहावा बळी ...

बांदा(सिंधुदुर्ग) :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली (ता. सावंतवाडी) येथील ६२ वर्षीय महिलेचे गोवा-बांबोळी येथे रुग्णालयात उपचारादरम्यान आज सकाळी निधन झाले. तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा एकूण सहावा बळी गेला आहे. तिला श्वास घेताना त्रास जाणवत होता. यासाठी तिला उपचारासाठी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा- कळसच : कोरोना बाधित रुग्णास आणावयास गेलेल्या पथकासह पोलिसांनवर केली दगडफेक.... -

गेले ८ दिवस त्याठिकाणी उपचार सुरू होते. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने तिला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते.उपचार सुरु असताना आज सकाळी तिचे निधन झाले. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा-गुड न्यूज : ऑफलाईन प्रवेशप्रक्रियेस रत्नागिरी, सिंधुदुर्गला परवानगी.. -

 इन्सुलि क्षेत्रफळ वाडीत यापूर्वी रुग्ण सापडले होते. मात्र त्यानंतर रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने इन्सुली गाव कोरोनामुक्त झाला होता. निधन झालेली महिला ही स्थानिक रहिवासी होती. तिला कोरोनाची लागण कशी झाली याची माहिती शोधण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करत आहे. गावात कोरोना रुग्ण नसल्याने कुडाळ येथे उपचार घेतलेल्या रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आरोग्य विभाग रुग्णाची सविस्तर माहिती गोळा करत आहे. त्यानंतरच तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 62 year old woman died undergoing treatment at a hospital in Goa-Bamboli death after Corona report positive