esakal | ....अन्यथा पुन्हा 7 दिवसाचा लॉकडाऊन ; जिल्हाधिकार्‍यांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

7 days lockdown again to break Corona chain in ratnagiri warning by District Collector Laxmi Narayan Mishra

 ब्रेक द चेनसाठी क्वारंटाईनचे नियम पाळा

....अन्यथा पुन्हा 7 दिवसाचा लॉकडाऊन ; जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी :  गणेशोत्सवात येणार्‍या चाकरमान्यांनी क्वारंटाईनचे निकष काटेकोर पाळले पाहिजेत. ते पाळले नाहीत आणि गणेशोत्सवानंतर कोरोनाचे रुग्ण वाढल्यास कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी पुन्हा 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज दिला.


गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जनतेला माहिती देण्यासाठी आज आयोजित फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. गणेशोत्सवानंतर लॉकडाऊन वाढवणार का? असा प्रश्न एका ग्रामस्थाने उपस्थित केला. यावर ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण असल्याने गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यानी नियम पाळून गावात रहावे. शासनाने आखून दिलेले धोरण पाळावे. गावकर्‍यांनी देखील चाकरमान्यांना मदत करावी. नियम पाळले न गेल्यास आणि गणेशोत्सवानंतरही कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास सात दिवसांचा लॉकडाऊन केला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती येणार नाही यासाठी सर्वांचे योगदान मौल्यवान असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- म्हणून कोकणातला हा बंधारा झाला शांत.. -


मात्र दुसरी दिलासादायक बाब म्हणजे गणेशोत्सव संपल्यानंतर मुंबईला परतणार्‍या चाकरमान्यांना तपासणी आणि टेस्ट करण्याची गरज नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्पष्ट केले. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र दुर्लक्षही करू नका. अधिकारी म्हणून आम्हीही सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. मात्र काही तांत्रिक गोष्टींचा विचार करून ते पाळणे शक्य होत नाही. मात्र यापुढे ही खबरदारी बाळगू, असे श्री. मुंढे म्हणाले.

हेही वाचा- रत्नागिरीत शिक्षकांच्या विनंती बदल्यांवर कोरोनाचे सावट -


रशियाने वॅक्सिन काढले आहे. भारत वॅक्सिंन टेस्टिंग सुरू आहे. दोन महिन्यात वॅक्सिन येईल. त्याचे कसे वाटप करायचे आदीचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे, असे श्री. मिश्रा यांनी सांगितले. जिल्ह्यात आता 3 हजार कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी 70 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 12 ते 13 टक्के आहे. मृत्यू दर देखील वाढला आहे. तो कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात आता ‘अर्ली डिटेक्शन’ मोहिमेची गरज आहे.थोडा जरी संशय आला तरी लवकरात लवकर टेस्टिंग करून घ्या, जेवढ्या लवकर त्यावर नियंत्रण आणू शकतो तेवढा त्याचा प्रसार कमी होतो.

हेही वाचा- चावा घेतला, की बोबडी वळलीच समजा -


शेवटच्या टप्प्यात येऊन रुग्णाला वाचविणे कठीण होते. क्वारंटाईनचा कालावधी 10 दिवसाचाच आहे. त्यानंतर पाच दिवस होम क्वारंटाईन व्हायचे आहे. ज्या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत, आणि जे तरुण आहेत, मात्र पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्यासाठी होम आयसोलेशनची मुभा आहे. मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोर करायची आहे.

संपादन - अर्चना बनगे