esakal | भाजपच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीत `या` सदस्यांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

70 Members In Ratnagiri BJP Committee Marathi News

लांजा, राजापूर, संगमेश्‍वर व रत्नागिरी तालुक्‍यातील मान्यवरांचा यात समावेश आहे. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जंबो कार्यकारिणी केली आहे. दक्षिण रत्नागिरीमध्ये भाजपला चांगले दिवस येण्यासाठी ही कार्यकारिणी मेहनत घेणार आहे.

भाजपच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीत `या` सदस्यांचा समावेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - तब्बल 70 सदस्य असलेली दक्षिण रत्नागिरी भाजपची नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी दिली. जनमानसात स्थान असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकारणीचे गठण केल्याचे दिसत आहे. 

लांजा, राजापूर, संगमेश्‍वर व रत्नागिरी तालुक्‍यातील मान्यवरांचा यात समावेश आहे. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जंबो कार्यकारिणी केली आहे. दक्षिण रत्नागिरीमध्ये भाजपला चांगले दिवस येण्यासाठी ही कार्यकारिणी मेहनत घेणार आहे. गेल्या पंधरवड्यात जिल्हा पदाधिकाऱ्यांची आणि अन्य सर्व आघाड्यांची घोषणा केली. नवीन पदाधिकारी आघाडीप्रमुख, मोर्चा अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची एकसंघ टीम मंडल अध्यक्ष आणि मंडल कार्यकारिणी यांच्यासह संघटना मजबुतीसाठी कार्यरत असेल, असे ऍड. पटवर्धन म्हणाले. प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा करून नवीन टीम जाहीर केली आहे. सर्व समाज घटकांना सामावून घेत नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ही कार्यकारिणी तयार केली आहे. 

यांचा आहे कार्यकारिणीत समावेश

वाघ्रोजी खानविलकर, प्रसन्न दीक्षित, तुकाराम किर्वे, विजय गांधी, शेखर जोगळे, डॉ. चंद्रशेखर केळकर, अकबर रखांगी, संतोष गुरव, भाई जठार, संगीता कवितके, शरयू गोताड, सत्यवती बोरकर, अमजद बोरकर, नीलेश लाड, ऍड. ऋषिकेश कवितके, डॉ. श्रीपाद मुळ्ये, श्रीरंग वैद्य, विजय बेहेरे, हेमंत चक्रदेव, शीतल पटेल, बाळ दाते, वसंत पाटील, सुरेंद्र अवसरे, सुधाकर सुर्वे, ऍड. अमित शिरगावकर, विजय कुबडे, डॉ. निशिगंधा पोक्षे, प्राजक्ता रुमडे, दाक्षायणी बोपर्डीकर, सुमिता भावे, राजीव कीर आदींचा समावेश आहे. 

संपादन - राजेंद्र घोरपडे

loading image