esakal | रत्नागिरीत एकाच दिवशी 772 कोरोनामुक्‍त तर 626 जण नव्याने बाधित; तीन दिवसांत 21 मृत

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत एकाच दिवशी 772 कोरोनामुक्‍त तर 626 जण नव्याने बाधित
रत्नागिरीत एकाच दिवशी 772 कोरोनामुक्‍त तर 626 जण नव्याने बाधित
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहाशेपेक्षा अधिक झाली आहे; मात्र तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक आहे. 772 जणं कोरोनामुक्‍त होऊन घरी परतले आहेत. मागील दोन दिवस मृतांची संख्या कमी झाली होती; मात्र मागील तीन दिवसांत 21 मृतांची नोंद झालेली आहे.

बाधितांचा आकडे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 21 हजार 695 वर पोचली आहे. 1 एप्रिलपासून आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या 10 हजार 666 वर पोचली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासात 2300 चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 1 हजार 674 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांच्या 626 अहवालात आरटीपीसीआरमध्ये 436 रुग्ण तर ऍटिजेन चाचणीत 190 रुग्ण बाधित होते.

गुहागर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर तालुका कोरोना बाधितांसाठी हॉटस्पॉट बनत आहेत. हेदवी आरोग्य केंद्रातील 26, कोतवडे केंद्रात 21, बुरंबीत 11, पावसमध्ये 11, दादरमध्ये 20, सोलगाव 32, टळवली 25, देवरुख सेंटर 23, धामापूर 26, संगमेश्‍वर 19 स्वॅब बाधित आले आहेत.

हेही वाचा- रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच धुम ठोकलेल्या 'त्या' तिघांचा अखेल लागला शोध

सर्वाधिक रुग्ण असलेली गावे, वाड्या कंटेन्मेंट झोन करण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच बरे होणारे रुग्ण वाढल्यामुळे प्रशासनावरील भार हलका होणार आहे. 772 रुग्ण बरे झाल्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 635 आहे. बरे होण्याचा दर 67.45 टक्‍केवर पोचला आहे. तीन दिवसातील एकूण मृतांचा आकडा 21 असून त्यातील वीस जणं हे मागील चोवीस तासातील आहेत. मृतांचा आकडा 640 वर पोचला आहे. मृत्यूदर 2.94 टक्‍के पर्यंत आहे.

जिल्ह्याची स्थिती

* एकूण बाधित 626

* आतापर्यंतचे बाधित 21,695

* आजचे अबाधित 1,674

* एकूण अबाधित 1,26,766

* आजचे बरे 772

* एकूण बरे झालेले 14,635

* आजचे मृत 21

* एकूण मृत 640

Edited By- Archana Banage