रत्नागिरी जिल्ह्यात साडेनऊशे बालके कुपोषित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी - जिल्ह्यात सुमारे 59 बालक तीव्र कुपोषित तर 891 बालके मध्यम कुपोषित आहेत. यामध्ये सर्वाधिक मुले ही कमी वजन असलेली आहेत. तीव्र कमी वजनाची 807 तर मध्यम कमी वजनाची 7 हजार 211 बालके सर्वेक्षणात आढळून आली आहेत. या बालकांचे प्रकृती स्वास्थ्य सुधारावे, यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

रत्नागिरी - जिल्ह्यात सुमारे 59 बालक तीव्र कुपोषित तर 891 बालके मध्यम कुपोषित आहेत. यामध्ये सर्वाधिक मुले ही कमी वजन असलेली आहेत. तीव्र कमी वजनाची 807 तर मध्यम कमी वजनाची 7 हजार 211 बालके सर्वेक्षणात आढळून आली आहेत. या बालकांचे प्रकृती स्वास्थ्य सुधारावे, यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून दर सहा महिन्यांनी कुपोषित बालकांचा आढावा घेतला जातो. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून कुपोषित बालकांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार खेड, मंडणगड, रत्नागिरी तालुक्‍यात कुपोषित बालकांचा टक्का सर्वाधिक आहे. जिल्ह्यात 0 ते 6 वयोगटातील 78 हजार 876 बालकांची तपासणी झाली. त्यापैकी 70 हजार 858 बालके सर्वसाधारण गटात आहेत. 950 कुपोषित बालकांमध्ये 59 बालके तीव्र कुपोषित (सॅम) तर 891 बालके मध्यम कुपोषित आहेत.

मंडणगडमध्ये 10, दापोली 9, दाभोळ 3, खेड 7, चिपळूण 3, गुहागर 5, संगमेश्वर 7, रत्नागिरीत 8, लांजा 2, राजापूर 5 आदी ठिकाणी तीव्र कुपोषित बालके होते. 

जिल्ह्यात कमी वजनाची सर्वाधिक मुले आहेत. मातांना पूरक पोषण आहार मिळत नसल्याने ही परिस्थिती उद्‌भवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी बालविकास केंद्रांमार्फत बालकांबरोबरच मातांना पूरक आहार उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचबरोबर प्रचार आणि प्रसिध्दीवरही भर देण्यात आला आहे. या केंद्रांमध्ये कुपोषित बालकांना दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार आणि सकस आहार दिला जात असल्याचे महिला व बालकल्याण अधिकारी ए. ए. आरगे यांनी सांगितले. 
 
कमी वजनाच्या बालकांची स्थिती 

तालुका               तीव्र कमी वजन           मध्यम कमी वजन 
* मंडणगड.............. 50............................. 327 
* दापोली................ 58............................. 373 
* दाभोळ................ 46............................. 368 
* खेड..................... 93............................. 621 
* चिपळूण............. .93............................. 996 
* गुहागर.................45............................. 483 
* संगमेश्वर............ 76............................. 864 
* रत्नागिरी.......... 153............................ 1581 
* लांजा..................79............................... 671 
* राजापूर............. 114...............................917 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 950 children under malnutrition in Ratnagiri district