esakal | दापोलीच्या 105 ग्रामपंचायतींवरही आरोग्य विभागाने कृपा दाखवावी
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

दापोलीच्या 105 ग्रामपंचायतींवरही आरोग्य विभागाने कृपा दाखवावी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : दापोली तालुक्यातील पिसई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असलेल्या करंजाणी या गावामध्ये ४ सप्टेंबर रोजी खास लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यात १५० जणांचे लसीकरण करण्यात आले होते मात्र यासंदर्भात कोणतीही प्रेसनोट जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून काढण्यात आलेली नव्हती त्यामुळे करंजाणी गावावर जी कृपा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दाखवली आहे तशी दापोली तालुक्यातील उर्वरित १०५ ग्रामपंचायतीवर दाखवावी किंवा या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे करणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती राजेश गुजर यांनी केली आहे.

दापोली पंचायत समितीची मासिक सभा आज झाली त्यात पिसई आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या करंजाणी गावात ४ सप्टेंबर रोजी लसीकरणासाठी १५० डोस आले होते ते कोठून आले व त्याची प्रेस नोट का काढण्यात आली होती का असा प्रश्न सदस्य राजेश गुजर यांनी विचारला असता हे डोस जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील डॉ. सुतार यांनी करंजाणी गावासाठी पाठविले होते. त्याची प्रेस नोट काढण्यात आलेली नसल्याची माहिती पिसई आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

त्यानंतर तत्कालीन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मरकड यांना बोलावण्यात आले त्यांनी वरिष्ठांनी जे आदेश दिले त्याचे आरोग्य विभागाने पालन केले असल्याची माहिती दिली त्यानंतर डॉ. सुतार यांच्याशी डॉ. मरकड यांनी संपर्क साधून पंचायत समितीच्या सभेत सुरु असलेल्या प्रकारची माहिती दिली व त्यावर खुलासा करताना डॉ. सुतार म्हणाले कि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बने यांनी केलेल्या शिफारसीवरून हि लस दापोली तालुक्यातील करंजाणी येथे देण्यात आली होती व त्याची प्रेसनोट काढण्यात आलेली नव्हती.

या संदर्भात बोलताना राजेश गुजर म्हणाले माझ्या पालगड पंचायत समिती गणात ८ हजार नागरिक अजूनही लसीकरणापासून वंचित आहेत त्यानाही अशा प्रकारे लस देण्यात यावी अशी मागणी आपण उद्या दापोली दौर्यावर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे आपण करणार असून या प्रश्नाची तड लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये असे ते म्हणाले.या सर्व प्रकारामुळे राजकीय शिफारसीमुळे लसीचा पुरवठा केला जात असल्याचे उघड झाले आहे.

loading image
go to top