esakal | 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' ; कोकणात खेर्डीमध्ये आरोग्याबाबत होतोय जागर
sakal

बोलून बातमी शोधा

aasha workers working in kokan village under the policy of maze kutumb mazi jababdari in ratnagiri

प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून आरोग्याचा जागरच होत आहे. याचा प्रत्यय आज खेर्डीमध्ये आला. 

'माझे कुटूंब माझी जबाबदारी' ; कोकणात खेर्डीमध्ये आरोग्याबाबत होतोय जागर

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : राज्य सरकारच्या 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या मोहीमेच्या निमित्ताने कोरोनापासून कसे दूर राहायचे, याचे आरोग्य शिक्षण आशा सेविकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला दिले जाते आहे. प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून आरोग्याचा जागरच होत आहे. याचा प्रत्यय आज खेर्डीमध्ये आला. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासन विविध उपायोजना राबवत आहे. 

राज्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी कोविडमुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबवली जात आहे. खेर्डी परिसरात ही मोहीम यशस्वी राबवण्यासाठी 13 आशा सेविका आणि 2 गटप्रवर्तक कामाला लागल्या आहेत. कोरोनाला सुरवात झाल्यापासून या आशा सेविका वैद्यकीय अधिकार्‍यांबरोबर कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबर कोरोनाविषयी जनजागृती करणे, गावात बाहेरून कोणी व्यक्ती आल्यावर त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्याचे काम आशा सेविकांनी केले. आता माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी सुद्धा आशा सेविकांनी घेतली आहे. 

हेही वाचा -  डोंगराच्या एका उंच खडकावर बसतोय बिबट्या, गावात होऊ लागली चर्चा

हातात थर्मल स्कॅनर गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर आणि हातात वही पेन घेत प्रत्येक घरादारात दोन आशा सेविका हजर होतात. त्यांच्या बरोबर स्थानिक प्रत्येकी एक स्त्री आणि पुरूष असतात. घरात माणसे किती ? पन्नास वर्षाच्या वरील किती ? लहान बाळ आहे का ? कोणाला ताप, थंडी आहे का ? सर्दी, खोकला आहे ? आजारी व्यक्तींनी वृद्ध, बालकांपासून लांब रहावे. काम असेल तरच बाहेर पडावे.

घरातून बाहेर पडलेल्या व्यक्तीने घरात आल्यानंतर वयोवृद्ध व्यक्तीकडे, बालके यांच्याकडे जाऊ नये. प्रथम सॉनिटाईझ करून घ्यावे. आजारी व्यक्तींच्या आहार, औषधांची आवश्यक काळजी घ्यावी. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अशा सूचना आशा सेविका खेर्डीत घरोघरी देताना आढळून येत आहेत. 

अशी घेतली जाते नोंद

घरातील 50 वर्षांवरील व्यक्तींचे नाव, वय, मोबाईल नंबर घेत त्यांचे थर्मल गनने तापमान, ऑक्सिजन लेव्हल तपासली जाते. तसेच मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, किडनी विकार असे गंभीर आजार त्यांना आहेत का? अशी विचारणा केली जाते. त्याची नोंद घेतली जाते. घरातील सदस्यांपैकी आधी कोणी कोरोना पॉझिटिव्ह आले असेल तर त्यांनी घ्यायची काळजी तसेच कोरोनाला दूर ठेवण्यासाठी उपाय सांगितले जातात.

हेही वाचा - ऑनलाइन शिक्षणात रेंजचा अडथळा ; कोकणात विद्यार्थ्यांना मिळतोय माळरानाचा आधार 

लक्षणे आढळल्यास फोन

"सर्दी, खोकला तसेच कोरोनासंबंधित लक्षणे आढळल्यास त्यांच्या नावाची वेगळी नोंद करत ही नावे आरोग्य अधिकार्‍यांना कळवली जातात. त्यानंतर त्या सदस्यांना फोन करत त्यांच्या आरोग्याची विचारणा करून कोरोना तपासणी करण्याची सूचना केली जाते."

- धनश्री शिंदे, गटप्रवर्तक खेर्डी

संपादन - स्नेहल कदम 

loading image