esakal | कोटमध्ये साकारली कोरोनातील भव्य अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्रकृती
sakal

बोलून बातमी शोधा

Abstract painting in coat lanja

आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच सोशल मीडियावर चांगले व्ह्यूज मिळवणारी ही प्रतिकृती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे

कोटमध्ये साकारली कोरोनातील भव्य अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्रकृती

sakal_logo
By
संदेश पटवर्धन

लांजा  - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, कोकणचे सुपुत्र महेश करंबेळे यांनी 25 फूट लांब व 6 फूट उंचीचे कोरोना काळातील सर्वात मोठे अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्रकृती लांजा तालुक्यातील कोट गावातील चिरेखाणीत साकारली. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच सोशल मीडियावर चांगले व्ह्यूज मिळवणारी ही प्रतिकृती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. महेश करंबेळे कोकणातील झाशीची राणी लक्ष्मीबाईचे सासर म्हणून प्रसिद्ध असलेल्या लांजा तालुक्यातील कोट गावचे सुपुत्र. 15 वर्षे चित्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मुंबई महानगरातील दैनंदिन सामाजिक जीवन’ या विषयावरील त्यांच्या तैलचित्रांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना ओळख मिळवून दिली. कला क्षेत्रातील न्यूयॉर्क आर्ट फेस्टिवल, मिलान फेस्टिवल, अ‍ॅमस्टरडॅम फेस्टिवल, दुबई आर्ट फेस्टिवल, रशिया आर्ट फेस्टिवल या आंतरराष्ट्रीय आर्ट फेस्टिवलमध्ये सातत्याने भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या करंबेळे यांचा मुंबईतील चाळीमधून प्रवास सुरू झाला. जो थक्क करणारा आहे. त्यांच्या चित्रांनी विविध देशातील कलारसिकांना मोहिनी घातली. पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, यु. के., यु. एस. ए., साउथ आफ्रिका, सिंगापूर, दुबई इत्यादी देशातील कलारसिकांनी करंबेळेंची चित्रे घेऊन आपला कलासंग्रह समृद्ध केला आहे.

हे पण वाचा गणेशमुर्तीत जिवंतपणा आणणारा अवलिया ! 

वयाच्या पस्तीशीत चित्रकला क्षेत्रात यशाची शिखरे सर करणार्‍या व सातासमुद्रापार आपल्या सुंदर चित्रांनी भारताची मान उंचावण्यार्‍या चित्रकार महेश करंबेळे यांना नुकताच कोट (ता. लांजा) येथे रंगलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनात कोकणातील प्रतिष्ठेचा नाटककार ला. कृ. आयरे कलाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
कोरोना काळात गावी आलेल्या महेश करंबेळे यांनी आपल्या कोट या मूळ गावातील चिरेखाणीत अमूर्त चित्र प्रकारातील भली मोठी चित्रकृती साकारली.  
   
संपादन - धनाजी सुर्वे