
राजापूर (रत्नागिरी) : राजापूर-कोदवली-हर्डी-रानतळे-पावसमार्गे रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावरील हर्डी कातळडा धबधब्यानजीकच्या पुलावरून दुचाकीसह दुचाकीस्वार सुमारे २५ फूट खाली दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज घडली. यामध्ये दुचाकीस्वार गौरव मिलिंद जाधव (वय २३, रा. भू राजापूर) हा जागीच ठार झाला आहे. दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये पुलाखाली असलेल्या दगडावर आपटून गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
गौरव जाधव हा सेंटरींगचे काम करत होता. बुधवारी (ता. १६) सुट्टी असल्याने राजापूर शहरामध्ये आला होता. राजापूरकडून भू कडे भरधाव वेगाने तो जात होता. त्यामध्ये हर्डी कातळडा धबधब्यानजीक आला असताना त्याला दुचाकी आवरता न आल्याने तो थेट रस्ता सोडून या पुलावर खाली कोसळला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलिस हवालदार बबन जाधव, प्रमोद वाघाटे, सागर कोरे, श्री. गोवले आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नगरसेवक सौरभ खडपे, आंबेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते सतीश बडंबे, संतोष कातकर, मंदार बडंबे, भास्कर कुवळेकर, दादू बोटले आदींसह या परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गौरव याचा भाऊ याच मार्गावरून जात असताना त्याला याबाबत माहिती मिळाली असता, तो घटनास्थळी दाखल झाला व त्याने सौरभ यास ओळखले. पंचनाम्यानंतर पोलिसांनी सौरभ याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.