esakal | सारा गाव हळहळला ; नातीला सोडायला गेलेले आजोबा वाटेतच मुकले जीवाला

बोलून बातमी शोधा

accident in mandangad ratnagiri one old person dead in case}

अपघातासंदर्भात मंडणगड पोलीस स्थानकात म्हाप्रळ येथे  राहणाऱ्या अब्दुलरझाक महमंद पिवी मोहल्ला यांनी दिली आहे. 

सारा गाव हळहळला ; नातीला सोडायला गेलेले आजोबा वाटेतच मुकले जीवाला
sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पन्हळीखुर्द पिकअप शेडच्या दरम्यान आज अपघाताची घटना घडली. रस्त्याच्या बाजूस असलेल्या दहा फुटी खड्यात दुचाकी पडली. यात हनुवटी आणि डोक्यास मार लागून म्हाप्रळ मोहल्ला येथील महमंद बशीर पिवी (वय 74) हे जागेवरच मयत झाले. त्यांच्यासोबत असणारी त्यांच्या 15 वर्षाच्या नातीस वफा सलाम राठवीलकर नाकास व डोक्यास गंभीर दुःखापत झाली. या अपघातासंदर्भात मंडणगड पोलीस स्थानकात अब्दुलरझाक महमंद पिवी (36) राहणार म्हाप्रळ मोहल्ला यांनी दिली आहे. 

हेही वाचा - त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही ; निलेश राणेंची टीका -

फिर्यादीत दिलेल्या माहीतीनुसार, महमंद हे सकाळी 8.50 वाजण्याच्या सुमारासस नात वफाला परिक्षेकरिता मोपेडवरुन मंडणगडकडे जात होते. दरम्यान पन्हळीखुर्द पिकअप शेडच्या पुढे शंभर मीटर अंतरावर, तोल न सावरल्याने मोपेड खड्यात जावून पडली. या अपघातात महमंद यांना यांच्या हनूवटी व डोक्यास मार लागून जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. तसेच वफाला गंभीर दुःखापत झाली. पुढील उपचारासाठी तातडीने तिला माणगाव येथे नेण्यात आले. मंडणगड पोलीस स्थानकात भा.द.वि. कलम 304 अ व मोटार वाहन कायदा 184 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास प्रभारी पोलीस निरिक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मयत महमंद पिवी यांचे शरीराचे भिंगळोली येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

महामार्गावरील खड्यांमुळे बळी गेल्याची नागरीकांमध्ये चर्चा
                      
गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे कामाकरिता म्हाप्रळ ते पाचरळ दरम्यानचे अंतरात पुर्वीचा जुना रस्ता खोदुन ठेवण्यात आला. त्यामुळे रस्ता ठिकठीकाणी वाहतुकीस अडचण येते. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरुन गाड्या चालविणे जिकरीचे बनले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. या मार्गावरुन जात असताना रस्त्यांच्या परिस्थितीमुळे वाहतूकीचे नियम शंभर टक्के पाळणे जात नाहीत. परिणामी चालकांना गाड्या चालविताना मोठी कसरत करावी लागते. या अपघातानंतर रस्त्यावरील खड्यांमुळेच एका जेष्ठ नागरीकांला जिवास मुकावे लागले असल्याची भावना बोलली जात आहे.  आता तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिककरण व प्रशासनास जाग येणार आहे की नाही असा प्रश्न तालुकावासीय करू लागले आहेत.
 

संपादन - स्नेहल कदम