esakal | मुंबई-गोवा महामार्गाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident in mumbai goa highway near one person dead in khed ratnagiri

दुचाकी आणि टाटा सुमोत समोरासमोर धडक बसून हा भीषण अपघात झाला. 

मुंबई-गोवा महामार्गाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : मुंबई गोवा महामार्गावर मोरवंडे फाटा नजीक दुचाकी आणि मोटारीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी (ता. 23) दुपारी एकच्या सुमारास झाला. दुचाकी आणि टाटा सुमोत समोरासमोर धडक बसून हा भीषण अपघात झाला. 

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी गंगाराम आखाडे (वय 43 रा. तिसंगी आखाडेवाडी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पाठीमागे बसलेले नरेंद्र किशोर शिरकर (रा. कळंबट- सुतारवाडी, ता. चिपळूण) हे गंभीर जखमी झाला असून बेशुद्धावस्थेत आहे. त्याच्यावर लवेल येथील घरडा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पुढील उपचारासाठी त्यांंना चिपळूण येथे हलवण्यात आले आहे. महामार्गावर ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून चिपळूण ते मुंबईच्या दिशेने येणार्‍या सुमोला (एमएच-01-बीटी-0817) मोटरसायकल (एमएच-08-एजे-3479) चालकाने जोरदार धडक दिली. या अपघातात संभाजी आखाडे जागीच ठार झाले, तर नरेंद्र शिरकर हे गंभीर जखमी झाले.

हेही वाचा - मनसेच्या नगराध्यक्षांना दिली साथ ; सेनेच्या भूमिकेची जोरदार चर्चा -

संपादन - स्नेहल कदम