मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यु

accident
accident

जिते - मुंबई-गोवा महामार्गावर डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. यशवंत घरत (वय ६०, खारपाडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातानंतर गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेऊन मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला होता. यावेळी डंपरच्या काचा फोडण्यात आल्या. तीन तासापासून ठप्प झालेली मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

जिते व खारपाडा गावातील महिला, तरुण वर्ग व ग्रामस्थांचा मोठ्या सख्येंने जमाव जमा झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. तब्बल तीन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी साडेअकराच्या सुमारास जिते गावाजवळ डंपरने (एमएच४६/एआर ५५३१) पुढे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला (एमएच ०६/ बिवाय १९८) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार यशवंत घरत हे जागीच ठार झाले. यशवंत घरत हे खारपाडा येथील रहिवाशी असल्याने अपघातानंतर खारपाडा येथील संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रास्तारोको केला. यावेळी संतप्त ग्रामस्थानी डंपरच्या काचा फोडल्या. तसेच मृतदेह रस्त्यावर ठेऊन डंपर चालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातानंतर जिते येथील परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते.  पोलिसांकडून संतप्त ग्रामस्थांना शांत करण्याचे प्रयत्न करून  महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com