संगमेश्वरनजीक एसटीला अपघात ,एका महिला गंभीर जखमी

संदेश पटवर्धन
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

रत्नागिरी - संगमेश्‍वरनजीक नायरी निवळी घाटात एसटी बसला अपघात झाला आहे. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला रत्नागिरीच्या येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य 25 प्रवाशी या अपघातामध्ये जखमी आहेत. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, निवळी येथे वस्तीला असणारी ही एसटी सकाळी साडे सहाच्या सुमारास देवरूखला जाण्यासाठी निघाली. नायरी निवळी घाटात या बसला अपघात झाला. एसटी बसने तीन पलट्या मारल्याने जखमी प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रवाशांना घाटातून बाहेर काढण्यासाठी धाव घेतली आहे. अद्याप प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जात आहे. 

Web Title: accident near Sangmeshwar in Nayari Nivali Ghat