esakal | मित्राची दुचाकी घेऊन जाताना अभियंत्यावर काळाची झडप

बोलून बातमी शोधा

accident in oros (kankavli)

हुंबरट-फोंडाघाट मार्गावरील डामरे-कानडेवाडी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून राधानगरी येथील अभियंता ठार झाला. ही घटना आज सकाळी 10.45 च्या सुमारास ही घटना घडली. सचिन मारुती टिपुगडे (वय 24) असे मृताचे नाव आहे. सचिन हे राधानगरीहून दुचाकीने ओरोसला निघाले असता अज्ञात वाहनाने मागाहून धडक दिल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे. 

मित्राची दुचाकी घेऊन जाताना अभियंत्यावर काळाची झडप
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) - हुंबरट-फोंडाघाट मार्गावरील डामरे-कानडेवाडी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून राधानगरी येथील अभियंता ठार झाला. ही घटना आज सकाळी 10.45 च्या सुमारास ही घटना घडली. सचिन मारुती टिपुगडे (वय 24) असे मृताचे नाव आहे. सचिन हे राधानगरीहून दुचाकीने ओरोसला निघाले असता अज्ञात वाहनाने मागाहून धडक दिल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे. 

आपल्या मित्राची दुचाकी घेऊन सचिन हे राधानगरी येथून सकाळी नऊ वाजता निघाले. फोंडाघाट बाजारपेठेतून निघाल्यानंतर डामरे-कानडेवाडी येथील काजू कारखान्यालगत सकाळी 10.45 च्या सुमारास ते दुचाकीसह रस्त्यावर पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. या अपघाताची माहिती मिळताच फोंडाघाट येथील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सचिन टिपुगडे याना तत्काळ फोंडाघाट आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून भाजपच्या रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले. 

दुचाकी अपघातानंतर फोंडाघाट येथील अण्णा पारकर, नितीन पालकर, विनोद भोगले, सुमित मेजारी, नईम शेख, राजू डॅनी, सुयोग कुबडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला वाचविण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. मात्र ते व्यर्थ ठरले. 

अपघाताचे वृत्त समजल्यानंतर सचिन यांच्या मित्रपरिवाराने कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. सचिन यांनी सिव्हिल इंजिनिअर पदवी घेतली होती. त्याचे वडील नाभिक समाजाचे अध्यक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. सचिन यांच्या मागे वडील, आई, भाऊ, चुलते असा परिवार आहे.