गोव्यातून रत्नागिरीला निघालेल्या मोटारीला अपघात ; सुदैवाने कोणती जीवितहानी नाही

accident in ratnagiri one car but no injured person accident
accident in ratnagiri one car but no injured person accident
Updated on

खारेपाटण (रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण वरचा स्टॅंड येथील उताराच्या वळणावर पुढचा टायर फुटल्याने मोटार पलटी झाली. यात आठ जण किरकोळ जखमी झाले. हे सर्व रत्नागिरीतील पर्यटक असून, ते गोव्यातून रत्नागिरीला जात होते. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. 

गोव्यातील पर्यटन आटोपून रत्नागिरीतील चालकासह आठ जण रत्नागिरीला निघाले होते. खारेपाटण वरचा स्टॅंण्ड येथे मोटार आली असता मोटारीचा पुढचा टायर फुटला. त्यानंतर मोटार २० फूट उजवीकडे डिव्हायडरवर जाऊन आपटली आणि पलटली. अपघातावेळी वरचा स्टॅंड येथून हायस्कूलकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. मात्र, दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन गाडी पलटल्याने अनर्थ टळला. सर्व जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अपघातावेळी वरचा स्टॅण्ड येथील रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले. तातडीने महामार्गावरून मोटार बाजूला करण्यात आली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam water storage latest news
Heavy Rain Brings Mumbai–Goa Highway to a Halt; Kashedi and Tamhini Ghats Shut
Waterlogging Halts Traffic on Mumbai–Pune Expressway, Thousands of Commuters Affected
Pothole Picnic Goes Viral: Residents Stage Symbolic Protest Against Neglected Road
Marathi News Esakal
www.esakal.com