ठाणे येथे अपघातात ओटवणेतील युवक ठार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 August 2019

ओटवणे - गावठणवाडी येथील युवकाचा ठाणे येथे अपघातात मृत्यू झाला. योगेश विष्णू गांवकर (वय 26) असे त्याचे नाव आहे. काल (ता.17) रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. 
योगेश हा आपल्या सहकारी मित्रा सोबत ठाणे येथे राहत होता. शनिवारी रात्री कामावरून आपल्या खोलीवर परतत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली.

अपघाताची भीषणता एवढी होती की गाडीवरून खाली जमिनीवर योगेश जोरदार आढळल्याने तो जागीच ठार झाला. अपघाताची गंभीरता बघून ट्रक चालकाने तेथुन पळ काढला. बाजूला असलेल्या एका रिक्षा चालकाने रक्तबंबाळ स्थितीत उचलून ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करून वाचविण्यासाठी प्रयत्न केले; मात्र त्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली होती. 

योगेश हा सावंतवाडी येथे महाविद्यालयात बी कॉमचे शिक्षण पूर्ण करून ठाणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करत होता. त्याचा स्वभाव मनमिळावू असल्याने गावात तो सर्वांसाठीच प्रिय होता. तो पुढच्या आठवड्यात गणपतीच्या तयारीसाठी गावी सुद्धा परतणार होता; पण त्याआधीच काळानेच त्याच्यावर घाला घातल्याने मोठा धक्का त्याच्या कुटुंबियांना व गावाला बसला आहे. त्याच्या अचानक जाण्याने ओटवणे गावांवर शोककळा पसरली आहे. त्याच्या मागे वडील, आई, मोठा भाऊ, काका असा परिवार आहे. माजगाव येथील ईकिरा कॉम्पुटरचे संचालक जयगणेश गांवकर यांचा तो लहान भाऊ तर दिवंगत पत्रकार अशोक गावकर, राजन गावकर यांचा तो पुतण्या होय. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident In Thane Youth from Otavane dead