आचरा सोसायटीवर भाजपचे वर्चस्व

१३ जागांवर बाजी; शिवसेना पुरस्कृत पॅनेलला मोठा झटका
Achara society election BJP dominance konkan update
Achara society election BJP dominance konkan updatesakal
Updated on

आचरा : श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आचरा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित सहकार पॅनेलने नाट्यमय घडामोडीनंतर तेराही जागांवर बाजी मारत निर्विवाद वर्चस्व मिळविले. शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत भाजपने निर्विवाद सत्ता आणत शिवसेनेला जोर का झटका दिला आहे.

१३ उमेदवारासाठी झालेल्या निवडणुकीत सुरुवातीस भाजप पुरस्कृत १२ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. शिवसेनेचा १ उमेदवार एका मताने विजयी झाला होता; मात्र भाजप पुरस्कृत उमेदवाराने फेरमोजणीची मागणी केल्यानंतर दोनदा झालेल्या फेरमोजणीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. भाजपने सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन केला. विजयानंतर भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

भाजपप्रणित सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. यामध्ये प्रिया आचरेकर ३२६ मते, समीर बावकर ३२१ मते, प्रफुल्ल घाडी ३३८ मते, अवधूत हळदणकर ३४० मते, लवू मालंडकर ३३७ मते, संतोष मिराशी ३२७ मते, प्रशांत पांगे ३२९ मते, धनंजय टेमकर ३६७ मते, लक्ष्मण आचरेकर ३४९ मते, डॉ. प्रमोद कोळंबकर ३७७ मते, निशा गावकर ३४२ मते, मनाली तोंडवळकर ३०४ मतांनी विजयी झाले. शिवसेना पुरस्कृत विनायक परब २९१ यांनी भाजप पुरस्कृत भिकाजी कदम २९० यांचा एका मताने पराभव करत निवडून आल्याचे जाहिर झाल्यावर त्यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत फेर मोजणीची मागणी केली.

यात विनायक परब यांचे एक मत कमी होत त्यांना २९० मते मिळाली तर भिकाजी कदम यांची दोन मते वाढून २९२ मते मिळवून निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकृष्ण मयेकर यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस, निलिमा सावंत, महेश हडकर, आचरा सरपंच प्रणया टेमकर, संतोष गांवकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, जयप्रकाश परुळेकर, देवेंद्र हडकर, उदय घाडी, विजय कदम यांसह बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.चिंदरकर म्हणाले, ‘‘भविष्यातीलही निवडणुका जिंकण्यासाठी सर्वांनी असेच प्रयत्न करावेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com