ॲसिडचा टँकर दरीत कोसळला; चालक जखमी,भाट्येतील घटना

ॲसिडचा टँकर दरीत कोसळला; चालक जखमी,भाट्येतील घटना
Updated on: 

रत्नागिरी: शहरातील भाटये (Bhate)येथील अवघड वळणावर अॅसिड घेऊन जाणारा टॅंकर दरीत कोसळला. हा अपघात आज सायंकाळी झाला. टॅंकरला काही प्रमाणात गळती लगल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. फिनोलेक्स कंपनीचा टॅंकर (Finolex company tanker)असल्याने प्रथम अॅसिड काढून टॅंकर रिकामा केला जाणार आहे. अपघातात चालक जखमी झाला आहे. कंपनी, पोलिसांचे मदत कार्य सुरू आहे. acid-tanker-crashed-into-the-valley-kokan-case-marathi-news

शहराजवळील भाट्ये येथील यु आकाराच्या तीव्र उतारावर हा अपघात झाला. टँकर फिनॉलेक्स कंपनीतून लोटे येथे जात होता. अवघड वळणावर चालचाका ताबा सुटून हा टँकर दरीत उलटला. सुदैवाने या अपघातात चालक वाचला. अपघातामुळे काही प्रमाणात ॲसिड गळती सुरू झाल्याचे नागरिकांचे मत आहे. अॅसिड असल्याने फिनोलेक्स कंपनीचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिस कर्मचारी, अधिकारीही दाखल झाले असून तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे. मात्र या पाऊस असल्याने गळतीमुळे काही प्रमाणात अॅसिड जवळच्या विहिरींमध्ये जाण्याच्या शक्यतेने नागरिकांना पाणी न पिण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी तपासणी झाल्यानंतर ते पिण्यास परवानगी दिली जाणार आहे. तोवर पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार आहे. त्यामुळे कंपनीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com