
-अमित गवळे
पाली : ताम्हिणी घाटात डोंगरवाडी गावाजवळ रविवारी (ता. 25) सकाळी हायड्रोक्लोरिक ॲसिड नेणारा टँकर रस्त्याच्या कडेला खाली पलटी झाला. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲसिड गळती झाली आणि धूर देखील निघत होता. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.