वाळूमाफियांविरोधात चौदा तास कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

संगमेश्‍वर - संगमेश्‍वर तालुक्‍यातील करजुवे खाडीपट्ट्यामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनावर महसूल विभागाने धाड टाकून वाळूमाफियांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत 6 सक्‍शन पंप व 4 बोटी नष्ट केल्या. याची किंमत 30 लाखांहून अधिक असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. ही कारवाईला 9 मे रोजी रात्री साडेअकरापर्यंत सुरू होती. 

करजुवे विचारेकोंड शाळेजवळ तसेच धामापूर, नारडुवे, कळंबुशी या ठिकाणी गेले काही दिवस सक्‍शन पंपाने अवैध वाळूू उत्खनन सुरू होते. याची माहिती मिळताच देवरूख तहसीलच्या वतीने चार- पाच वेळा धाड टाकून कारवाई करण्यात आली. तरीही सक्‍शन पंपाने अवैध वाळू उपसा सुरूच होता. या विरोधात तक्रारी करण्यात आल्या. तहसीलदार संदीप कदम यांच्या पथकाने बुधवारी कारवाईत हायड्राच्या (क्रेन) साह्याने सहा सक्‍शन पंप खाडीतून बाहेर काढून तोडण्यात आले.

चार बोटी गॅस कटरच्या साह्याने कापून टाकण्यात आल्या. कारवाईमध्ये चार बोटी आणि सहा पंप असे सुमारे 30 लाखांचे साहित्य तोडून टाकण्यात आले. तहसीलदार संदीप कदम यांच्यासमवेत मंडल अधिकारी एम. ई. जाधव, एन. डी. कांबळे, सी. एस. गमरे, नीलेश पाटील, सी. एम. मांडवकर, व्ही. आर. सराई, यू. एस. माळी, एस. एच. शिंदे, बी. डी. चव्हाण, डी. के. साळवी या महसूलच्या पथकाबरोबरच माखजन दूरक्षेत्राचे पोलिस सागर मुरूडकर व उशांत देशमवाढ यांनी ही कारवाई केली. 

गॅस कटर आणि टेंपो यांचा वापर 
या कारवाईकरीता देवरूख महसूल विभागाने हायड्रा, गॅस कटर आणि टेंपो यांचा वापर केला. ही कारवाई करताना 54 ब्रास वाळूसाठा जप्त केला. सहा सक्‍शन पंपामध्ये पूर्वी जप्त करून गुन्हा दाखल असलेल्या दोन पंपांचा समावेश आहे. हे दोन्ही सक्‍शन पंप क्रेनच्या साह्याने पाण्यातून बाहेर काढण्यात आले. बुधवारी करण्यात आलेली कारवाई संगमेश्वर पोलिसांना सोबत घेऊनच करण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action against the sand mafia in Sangmeshwar Taluka