याच्यामुळेच रत्नागिरीचे आले आरोग्य धोक्यात : कोण केला आरोप.... वाचा

ad deepak patwardhan speech in kokan people
ad deepak patwardhan speech in kokan people

रत्नागिरी : जिल्ह्यावासियांचे आरोग्य धोक्यात आणण्यात पूर्णतः सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशी रोखठोक भूमिका भाजपा अध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी मांडली आहे.

कोरोनाचे संकट रत्नागिरीमध्ये अधिक गडद होत आहे. ७५ ची संख्या पार झालेले कोरोना रुग्ण आणि मुंबई आणि अन्य ठिकाणाहून रत्नागिरीत परतणार यामुळे अधिकच धोका आहे. अपुरी आरोग्य सुविधा, प्रलंबित असणारे हजारो स्वॅब टेस्ट रिपोर्ट, गावोगावी बाहेर शहरातून पोचलेले नागरिक त्यामुळे गावागावात बैचेनी वाढत आहे .उद्वेग व भिती; पोलिस, आरोग्य व अन्य यंत्रणेवर पडत असलेला असह्य ताण आणि सत्ताधीश पक्षांचे असलेले सर्व लोकप्रतिनिधी यांची निद्रिस्त स्वरुपाची भूमिका असा सर्व अनागोंदी कारभार दिसत आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यावासियांचे व येणाऱ्या भूमिपुत्रांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आणि या परिस्थितीला पूर्णांशाने सत्ताधारीच जबाबदार आहेत. 


   कोरोना लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून रत्नागिरी जिल्हा भाजपा मागणी करताहेत. आरोग्य सुविधा वाढवा, स्वॅब तपासणी लॅब रत्नागिरीत सुरु करा. अन्यथा स्थानिक व येणारे मुंबईकर या सर्वांचेच आरोग्य धोक्यात येईल. मात्र शासनाने मनमानीपणे मुंबईतून रत्नागिरीत नागरिकांना येऊ दिले पण त्यांच्या आरोग्य सुविधेबद्दल कोणताही विचार केला नाही.  गेले दोन तीन दिवस स्वॅब तपासणी कीटही पुरेश्या संख्येत उपलब्ध नाहीत इतकी वाईट अवस्था आहे. ७ कोटी आरोग्य यंत्रणेवर खर्च केल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रत्यक्षात सर्वच सुविधा अपूर्ण आणि तोकड्या असल्याचा अनुभव येतो.

दोन महिने स्थानिकांनी लॉकडाऊन पाळले आणि आता कोरोनाग्रस्त भागातील नागरिकांचा खुलेआम सुरु असलेला वावर धोकादायक आहे .बाह्य जिल्ह्यातील फिरणारी वाहने या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा व शासकीय कर्मचाऱ्यांची  परवड होत आहे . शासन यंत्रणेत पालकमंत्र्यांच्या पदाला जिल्ह्यासाठी महत्व असते मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री जाणवलेच नाहीत. मुंबईकर आपले बांधव हे स्थानिकांनी कधीच नाकारले नाही त्याची आठवण करून भावनिक व्दंद लावून आपल्या अक्षम्य अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न चालू आहे याचीही कीव करावी वाटते, अशी बोचरी टीका भाजपा अध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com