
पाली : आदिती तटकरे यांना मंत्री पदाची धुरा स्वीकारल्या नंतर रायगडच्या भूमीत सोमवारी (ता. 23) सायंकाळी ठिकठिकाणी स्वागत व सत्कार करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गांवर वाकण नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) सुधागड तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड तालुक्यातील व वाकण पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी औक्षण करून बेंजो वाजवत, फटाके फोडून, शाल व श्रीफळ देऊन पुष्पहार घालून मंत्री अदिती तटकरे यांचे जंगी स्वागत व सत्कार केला. महिला, तरुण व बालकांसाठी विशेष उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी अदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच पदाबाबत विचारल्यास त्या म्हणाल्या की पालकमंत्री हे एक पद आहे.