रखडलेल्या कामांवरून प्रशासन धारेवर; चिपळूणकर आक्रमक | chiplun nagar parishad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun

रखडलेल्या कामांवरून प्रशासन धारेवर; चिपळूणकर आक्रमक

चिपळूण : शहरातील रस्त्यांसह अनेक विकासकामांचा पालिकेतील राजकारणात गेल्या पाच वर्षांत बोजवारा उडाला. लोकप्रतिनिधींच्या कारभाराचे हे नमुने शहरातील रस्तोरस्ती पसरले असल्याचा आरोप नागरिक अनेक दिवस करीत आहेत. आता पालिकेतील लोकप्रतिनिधींची राजवट संपली. त्यामुळे आता जनता प्रशासनाला धारेवर धरू लागली आहे. रस्त्यांची अनेक कामे अर्धवट, काही तर भूमिपूजन करून ठप्प, त्यामुळे कामाची मुदतही संपत आली आहे. या साऱ्याविरुद्ध आता चिपळूणकर आक्रमक(aggressive Chiplunkar ) झाले असून, त्यात काही लोकप्रतिनिधींनीही(People's Representatives) सूर मिसळला आहे. त्यामुळे जनता आंदोलनाची भाषा करीत आहे.

हेही वाचा: रत्नागिरी विमानतळासाठी होणार १८ एकर भूसंपादन

चिपळूण नगर परिषदेच्या(chiplun nagar parishad) नाजीकच्या भागांतील विकासकामे अद्यापही रखडलेली असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत ती कामे प्रत्यक्ष सुरू न झाल्यास नागरिकांसह नगर परिषदेत ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वैश्‍यवसाहत येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन शेट्ये यांनी मुख्याधिकारी शिंगटे यांना दिला आहे. वडनाका सोनारआळी ते जनता (गोखले) हॉस्पिटल, शेट्ये नाका या भागांतील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत करून स्थगित ठेवले आहे. वैश्‍यवसाहत मुरलीधर मंदिर ते राऊतआळी गणपती मंदिर या शहरातील महत्त्वाच्या भागामध्ये गेली दोन ते तीन वर्षे कामाची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रखडलेल्या कामांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

हेही वाचा: फास्टर नौका मोकाट : स्थानिकांना त्रास; नव्या कायद्याविरोधात घेतला आक्रमक पवित्रा

विकासकामांचे नारळ फक्त धडाक्यात

प्रभागातील नागरिकांना खूश करण्यासाठी विकासकामांचे नारळ धडाक्यात फोडण्यात आले. मात्र, पुढे काम सुरू होण्याचा पत्ता नाही. नगरपालिकेच्या नजीकच्या भागातील ही अर्धवट स्थितीत राहिली आहेत. त्यामुळे ही कामे सुरू न झाल्यास या भागातील नागरिक नगरपालिकेत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

भूमिपूजनाला दोन महिने झाले तरी...

चिपळूण नगरपालिकेच्या(chiplun nagarparishad) जवळच असलेल्या शिवनदी पूल, एकवीरा मंदिर, वडनाका, बापटआळी, जुना कालभैरव मंदिर, लोकमान्य टिळक वाचनालय, वेस मारुती मंदिर या रस्त्याचे भूमिपूजन समारंभ करून दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस होऊनही प्रत्यक्ष कामाला कोणत्याही प्रकारची सुरुवात झालेली नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top